मतदान जनजागृती कार्याबद्दल प्रकाश तेली यांचा जिल्हाअधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या कडून विशेष गौरव

मतदान जनजागृती कार्याबद्दल प्रकाश तेली यांचा जिल्हाअधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या कडून विशेष गौरव

जळगाव :- मतदान जनजागृती व मतदानाचे महत्व ह्या क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल कवी लेखक व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांचा 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिना निम्मित अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, आप्पासाहेब रामदास सुकलाल तेली, उप वनसरंक्षक विवेक होशिंग, नाहाटा कॉलेजचे प्राचार्य एस.व्ही. पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डांगर, भुसावळचे प्रांतधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दिपक धिवरे, अ‍ॅड. किरण तेली व मान्यवरांच्या शुभहस्ते नाहाटा कॉलेज भुसावळ येथे गौरव करण्यात आला

मतदान जनजागृती साठी काय केले आहे प्रकाश तेली यांनी:-
प्रकाश तेली यांनी मतदान जनजागृती साठी 600 पेक्षा जास्त ट्विट, 170 पेक्षा जास्त कविता, वोट आणि वोट -2 ही पुस्तके, आणि 400 पेक्षा जास्त घोष वाक्य (कोट्स) लिहिलेले आहेत व भविष्यात वोट -3 आणि वोट्स वर कोट्स ही पुस्तके देखील येणार आहेत.

प्रकाश तेली यांचे जानेवारी 2022 पासून आज पर्यंत 7 काव्य संग्रह प्रकाशित:- प्रकाश तेली यांनी 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त घोष वाक्य (कोट्स) लिहिलेले आहेत ते एक एक करून प्रकशित होट असून जानेवारी 2022 पासून आज पर्यंत त्यांचे पुढील काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत 1) सड़क सुरक्षा 2) बढ़ती जनसंख्या 3) वोट 4) बालविवाह 5) नदी – भारत की जलधारा 6) किसान 7) वोट-2 त्यांच्या ह्या सामाजिक काव्य संग्रहांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक केंद्रीय आणि महाराष्ट्राचे मंत्री व अनेक मान्यवर यांनी कौतुक केले आहे