Home महाराष्ट्र थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव (प्रतिनिधी) – थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील अंधश्रद्धा, सावकारी प्रथा व अशिक्षण दूर करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या गाडगे महाराजांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.

संत गाडगे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ उभी केली. त्यांच्या कीर्तनांना दहा-दहा हजार लोकांची उपस्थिती असायची. देवभक्ती ही डोळसपणे व विवेकाने करावी, स्वच्छता हीच खरी सेवा आहे, शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, असा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविला. अंधश्रद्धा, जातिभेद आणि व्यसनाधीनतेविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेत समाजात जागृती निर्माण केली.

गाडगे महाराजांचे काही मोजके शिष्य होते. त्यापैकी बारी समाजाचे दैवत संत श्री रूपलाल महाराज यांनी गाडगे महाराजांचा वसा जपत आयुष्यभर स्वच्छता व समाजजागृतीचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचा उल्लेख करत उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास गोकुळ रोकडे, दत्तू रोकडे, रघुनाथ काटोले, संतोष महाले व समस्त समाज परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

गाडगेबाबा स्वच्छता अभियान

संत गाडगे महाराजांनी “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. गावात प्रवेश करण्यापूर्वी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची त्यांची पद्धत समाजासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या स्मरणार्थ राबविण्यात येणारे “गाडगेबाबा स्वच्छता अभियान” हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संगम साधत हे अभियान आजही समाजाला दिशा देत आहे.

Don`t copy text!