भडगाव महाविद्यालयात भूगोल विभागात ग्रंथालयाचे उद्घाटन

भडगाव महाविद्यालयात भूगोल विभागात ग्रंथालयाचे उद्घाटन

 

भडगाव: सौ. रजनीताई नानासाहेब देशमूख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव जि. जळगाव येथील भूगोल विभागात दि. २२ सप्टेंबर २०२३ ला मा. प्राचार्य डाॅ. एन. एन. गायकवाड यांच्या हस्ते विभागिय ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. अशाप्रकारच्या विभागातील सोयी व सूविधांमूळे विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास सूलभता होत असल्याचे मत मा. प्राचार्यांनी व्यक्त केले व विभागाच्या या कृतीला शूभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षिय स्थान मा. प्राचार्य डाॅ. ना. ना. गायकवाड सर यांनी भूषविले तर कार्यक्रमाच्या प्रमूख स्थानी भूगोल विभाग प्रमूख प्रा. डाॅ. संजय भैसे सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवेंद्र मस्की यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू. प्रज्ञा सोनवाने हिने केले तर आभार कू. नेहा शिरसाठ हिने केले. कार्यक्रमाला प्रा. सूरेश कोळी, डाॅ. चित्रा पाटील मॅडम, डाॅ. इंदिरा लोखंडे मॅडम, प्रा. नन्नवरे मॅडम, प्रा. मोहनदास महाजन, डाॅ. राजपूत तसेच द्वितीय व तृतीय वर्ष भूगोलाचे विद्यार्थी उपस्थित होते.