राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी) येथील महालपुरे मंगल कार्यालय येथे सोमवार 7 मार्च रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार दिलीप वाघ. गटनेते संजय वाघ .यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी मार्गदर्शक अविनाश अदिक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा यश हमखास मिळेल पवार साहेबांचे विचार खेडोपाडी पोचवा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली व दिलीप भाऊंवाघ यांचा विजय आगामी निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास वाटतो कार्यकर्त्यांनी बूथ निहाय काम करावे साठी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या. पुढील मनोगता साठी प्रदेश सरचिटणीस एजज मलिक, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, योगेश देसले, कल्पना पाटील,प्रतिभा पाटील, मझहर खान अरविंद मानकरी माजी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगतात भविष्यात विजया ची सुरुवात झाली असून पक्ष बळकटीसाठी कार्यकर्ते जोमाने कार्यात लागले आहेत असे मनोगत व्यक्त केले. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ,नगरसेवक पदाधिकारी तसेच महिला, युवा, व्यापारी, शेतकरी ,आघाडीच्या सर्व पदाधिकारी व फ्रेंडस चे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाहन विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे. यांनी प्रास्ताविकामध्ये लेखाजोखा मांडला तालुका अध्यक्ष विकास पाटील. शहराध्यक्ष अझहर खान यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक भूषण वाघ, नवीन युवकांची कार्यकारणी व पक्ष बळकटीसाठी ध्येय धोरण व केलेल्या कामाची एक पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी पिटीसी चेअरमन संजय वाउ,डॉक्टर संजीव पाटील, खलील देशमुख, शालिग्राम मालकर,महिला राष्ट्रवादी पदाधिकारी रेखाबाई, योजना चौधरी नगरसेविका सुचेता वाघ, ज्योती वाघ,महिला तालुकाध्यक्ष दिशा भोसले, सुलोचना देवरे, सरला पाटील, सुनिता मांडोळे सीमा देसले, नाना देवरे, प्रकाश पाटील,नगरसेवक वासुदेव महाजन, रणजीत पाटील, प्रकाश भोसले, प्राध्यापक भागवत मालपुरे, नगरसेवक मोरे, मधुकर पाटील, अरुण देशमुख पंचायत समिती सदस्य ललित वाघ, सुदाम वाघ, माणिक पाटील, नगरसेवक वाजिद बागवान, योगेश पाटील, रज्जाक भाई, पिंटू ब्राह्मणे, योगेश महाजन, गद्दारी नगर देवळा येथील कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, विकास सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,युवकांचे प्रमुख अभिजित पवार. यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी यावेळी कृष्णापुरी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला