पीरबाबांचा यात्रोउत्सव वाघुलखेड्याला सुरु

पीरबाबांचा यात्रोउत्सव वाघुलखेड्याला सुरु

पाचोरा प्रतिनिधी =
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिरबाबांच्या यात्रोत्सवास आज पासुन वाघुलखेडा येथे सुरुवात झाली आहे.दि. 21 सोमवार रोजी वाघुलखेड्याला याञोत्सव संपन्न होत आहे.या याञोत्सवासाठी परिसरातुन भाविक भक्तिभावाने मोठ्या संख्येने उपस्थित होतात.सर्व समाजातील लोक याठिकाणी आपल्या परिवारासह हजेरी लावतात.याञे निमित्त सर्व गावातील हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होतात.
पीरबाबांचा दर्गा गावापासून दोन किमी अंतरावर निसर्ग रम्य अशा वातावरणात असुन वाघुलखेडा येथील रामभाऊ नथ्‍थु पाटील यांच्या शेतात दर्गा आहे ते स्वतः या दर्ग्याची देखभाल करतात .
दि.20 रोजी सोमवारी हिंदू मुस्लिम बांधवांनी संदलची मिरवणूक काढली पिर बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा कार्यक्रम झाला. यात्रेला पहिल्या दिवशी सायंकाळी गावात प्रत्येकाच्या घरी गोड भात (न्यास ) करण्यात येतो सायंकाळी घरातील प्रत्येक व्यक्ती पीरबाबांना नैवेद्य दाखवून गोड जेवण करतात.या गावाची यात्रा सर्वात मोठी भरती. कारण यात्रेचे मुख्य केंद्र शेतात असल्याने ग्रामस्थ उत्साहाने यात्रेत सहभागी होतात. यात्रेत संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात.याञे निमित्त गावात मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त गावात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

पिरबाबांच्या दर्गाचे काम होतेय लोकसहभागातून…

पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील प्रसिद्ध असलेल्या पिरबाबांच्या यात्रोत्सवास मोठ्या संख्येने भाविक भक्तिभावाने येथे येऊन पूजा आर्चा करून नवस फेडण्यासाठी येतात. तर काही नवस बोलतात अशा या हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिरबाबांच्या दर्गाचे भव्य असे बांधकाम सुरू आहे.हे काम संपुर्ण लोक सहभागाने सुरू आहे त्या बांधकामासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सुनिल वसंतराव देशमुख, नामदेव नथ्थु पाटील, माजी सरपंच गणेश प्रकाश पाटील वाघुलखेडा यांनी केले आहे.