नांद्रा येथे पुलवामा घटनेतील शहीद जवानांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली अर्पण

नांद्रा येथे पुलवामा घटनेतील शहीद जवानांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली अर्पण

नांद्रा ता. पाचोरा,येथे सन 2019 रोजी पुलवामा येथे जो अतिरेक्यांनी ग्रेनाईट चा भ्याड हल्ला केला होता त्यामध्ये आपल्या भारतमाताच्या सेवेसाठी कर्तव्य बजावन्यासाठी जाणाऱ्या बीएसएफचे 42 वीर जवान शहीद झाले होते आज त्या घटनेला चार वर्ष पूर्ण होत असून या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शहीद वीर जवान त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांद्रा येथील महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये बीएसएफ जवान विनोद सूर्यवंशी याबरोबरच इतर जवान माजी सैनिक, तंटामुक्ती अध्यक्ष व महादेव मंदिर संस्थान अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर,माजी सैनिक भगवान दादा तावडे, रमेश आबा सूर्यवंशी, विनोद आप्पा बाविस्कर, सखाराम तुकाराम पाटील, दिलीप नामदेव सूर्यवंशी,गणेश दशरथ सूर्यवंशी,मनोज भाऊराव सूर्यवंशी,हिरालाल सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, राजू कुंभार,पंडित कुंभार,अमृत पाटील, अपंग बंधू विनोद सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाविस्कर,संदीप सूर्यवंशी दामू शेठ खैरनार,सर्व गावातील जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी गावातील सैन्य दलात कार्यरत सैनिक यांचे वडील,शिक्षक, पत्रकारबंधू व तरुण मित्र मंडळ यांनी या ठिकाणी शहीद जवानांना मेणबत्ती व दीप लावून, फुले वाहून व शांती मंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.यशवंत पवार यांनी केले याप्रसंगी पुलवामा येथील भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करून भारत माता की जय, वंदे मातरम,वीर जवान अमर रहे, जय जवान जय किसान या घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते