पाचोरा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रेचा शुभारंभ .

पाचोऱ्यात शरद युवा संवाद यात्रा
पाचोरा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात शरद युवा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही यात्रा पोहोचणार असून या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी,माजी आमदार दिलीप वाघ यांचेसह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व युवक कार्यकर्ते बूथप्रमुख,बूथ कार्यकर्ते,युवती,महिला तसेच सर्व फ्रंटचे प्रमुख पदाधिकारी,
लोकप्रतिनिधी, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.