गो से हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व सत्कार समारंभ उत्साहात साजरा

गो से हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन व सत्कार समारंभ उत्साहात साजरा

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त गो से हायस्कूल येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण व सत्कार अशा या संयुक्त कार्यक्रमात तांत्रिक विभागाचे चेअरमन तथा नगरसेवक आण्‍णासो वासुदेव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे स्पर्धा परीक्षा सारथी या पुस्तकाच्या प्रकाशन ना बद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ यांचा शालेय समिती चेअरमन खालील दादा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यांच्यासमवेत आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचा देखील सत्कार समारंभ याठिकाणी संपन्न झाला. इयत्ता आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा देखील याप्रसंगी पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी मनोगतातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व पुस्तक प्रकाशनाचा उद्देश स्पष्ट केला तर मा खलील दादा देशमुख यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व अधोरेखित केले. या संयुक्त कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री एस टी अहिरे श्री एस एच पवार माजी पर्यवेक्षक श्री पी डी वाणी श्री शांताराम चौधरी पी जे पाटील श्री अनिल कासार श्री अशोक पाटील श्री बापू चौधरी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका सौ पी एम वाघ पर्यवेक्षक श्री आर एल पाटील श्री एन आर ठाकरे श्री ए बी अहिरे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री आर बी तडवी कार्यालय अधीक्षक श्री अजय सिनकर किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री मनिष बाविस्कर तांत्रिक विभाग प्रमुख श्री एस एन पाटील उपस्थित होते सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश कौण्डिन्य यांनी आभार प्रदर्शन श्री ए बी अहिरे यांनी केले