बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रा येथे नावातील बदल करण्यसाठी सर्विस चार्ज लागला 360 रुपये

बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रा येथे नावातील बदल करण्यसाठी सर्विस चार्ज लागला 360 रुपये

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहार )- येथील संजू श्रीराम भोई या हात मजुरी करणाऱ्या भाजीपाला विक्रेता व्यक्तीचे खाते बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रे येथे याच नावाने रजिस्टर होते परंतु त्यांच्या आधार कार्डवर संजय श्रीराम भोई हे त्यांचं नाव होते संजू व संजय या दोन व्यक्ती एकच असल्याचे स्वयम घोषणा पत्र त्यानी बँकेत जमा केले परंतु त्याबरोबरच त्यांच्या नावाच्या पुढे एक अक्षर वाढवण्याची मात्र त्याना 360 रु सर्व्हिस चाज म्हणून किंमत द्यावी लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहै. या अगोदर ही खाते बंद पडल्यावर ते पुन्हा सुरु करण्यासाठी 120रु सर्विस चाज लागायचा पण आत्ता नावांमध्ये असलेली केवळ एक अक्षर दुरुस्ती साठी 360/रु लागल्याने गोरगरीब लोक हवालदिल झाले असून बँक्यत खातेवर पैसे भरायचे का नुसता सर्विस चाज द्यायचा असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उपस्तित झाला आहै.यासंदर्भात पास बुक मधील दुरुस्ती तील नियमावली ही बँकेच्या दर्शनी भागात लावणे हे बँकेचं काम असल्याने व त्यावर लागणारा सर्विस चार्ज हा सुद्धा तिथे लावणे अपेक्षित असल्याचे ग्राहका मध्ये बोलले जात असून मुळातच झिरो बॅलन्सवर प्रधानमंत्री साहेबांनी गोरगरीब जनतेला बचत करण्याचे महत्त्व व त्या आधारे प्रधानमंत्री विमा योजना लागू करता यावी या अनुषंगाने शून्य रुपयावर बँक खाते मोठ्या प्रमाणात खोलले सुद्धा आहै परंतु आता याच बँक अव्वाच्या सव्वा सर्विस चाज लावत असल्यामुळे गरीब लोकांच्या छोट्याच्या कागदपत्रे दुरुस्तीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी त्या ग्राहकास समवेत बँकेत जाऊन बँक मॅनेजर दीपक टोणगे यांना विचारणा केली असता त्यांनी याच प्रकारे नवीन नियम असल्याचे सांगितले त्यामुळे ऑनलाईन बँकिंग त्या क्षेत्रात ऑफलाइन कागदपत्र अपडेट साठी पासबुक अपडेट साठी इतका खर्च लागत असल्याने ग्राहक व ग्रामीण भागात गोरगरीब जनता आचंबित झाले आहे त्यामुळे बँकेचे हे अतिरिक्त वाढीव शुल्क संबंधित विभागाकडून कमी व्हावे अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे