जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल जिल्हा परिषद जळगाव (CEO) यांची अचानक भेट…
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी *माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल मॅडम जि.प. जळगाव व माननीय श्रीमती सरला पाटील मॅडम गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती जळगाव* तसेच माननीय श्री पुलकेशी केदार साहेब ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, माननीय श्री उज्वल साळुंखे साहेब अभियंता पंचायत समिती जळगाव, माननीय श्री शांताराम जी कुंभार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी शिरसोली बीट, पंचायत समिती स्तरीय अधिकारी, माननीय केंद्रप्रमुख श्री.प्रदिप राजपूत सर, माननीय श्री संजय मोरे सरपंच ग्रामपंचायत म्हसावद व मान्यवर सदस्य ग्रामपंचायत म्हसावद यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा म्हसावद बाॅईज तालुका जळगाव जिल्हा जळगाव येथे आज दिनांक 06/11/2025 वार गुरूवार रोजी अचानक भेट दिली.मा.श्रीमती करनवाल मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी
हितगुज साधले.शालेय परिसर, स्वच्छतागृह, शालेय पोषण आहार धान्यादी माल तपासणी व आजचा मेनू चना पुलाव चणे खाऊन तपासणी केली असता समाधान व्यक्त केले.

















