पाचोरा मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देणार- आमदार किशोरअप्पा पाटील

पाचोरा मतदार संघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देणार- आमदार किशोरअप्पा पाटील

नांद्रा ता. पाचोरा येथे दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन सोहळा पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी कुरंगी बांबरुड गटातील जि प सदस्य पदमसिंह पाटील यांनी गटातील केलेले विविध मंजूर विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.या यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन, नांद्रा येथील शिवस्मारक चौक सुशोभीकरण करणे, हँडसन पहान रस्ता दुरुस्त करणे या कामाचे भूमिपूजन व फलक अनावरण करून गटातील जवळजवळ विविध गावातील वीस ते पंचवीस कामांना टप्प्या-टप्प्याने भूमिपूजन व उदाघाटन करून त्यांचा श्रीगणेशा होणार आहे.कुरंगी बाबरूड गटातील जिल्हा परिषद सदस्य बापुसो पदमसिंह पाटील यांच्या जिल्हा विकास निधीतून सुमारे सात कोटी चे विकास कामे खेचून आणलेले आहेत त्यातुन गटातील विविध कामांच्या भूमिपूजन प्रसंगी नांद्रा येथील सुमारे चार कोटी वीस लाख रुपयाचा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे त्याचे भूमिपूजन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी आमदार साहेब यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की नांद्रा परिसरातील खेड्याला लागून असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या नूतन वास्तूच्या नूतन उभारणीमुळे परिसरातील गोरगरीब जनता यांना चांगली आरोग्य सेवा मिळेल. या बरोबरच काही वेळेस गावांमध्ये एखादी वेळेस आरोग्य विषयी दुर्घटना घडल्यावर तात्काळ जळगाव किंवा पाचोरा घेऊन जाण्यासाठी अंबुलन्स मिळत नाही त्या साठी आपण संपूर्ण मतदारसंघात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका लोकार्पण करणार आहोत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले व या रुग्णवाहिका फक्त जळगाव व पाचोरा जिल्ह्यातच घेऊन जाण्यासाठी असतील.याबरोबरच कर्मचाऱ्यांचा अपूर्ण स्टॉप तोही भरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार व पंकज बाविस्कर यांनी केले. याप्रसंगी जि प सदस्य दीपक सिंग राजपूत, कृ. उ.बाजार समिती संचालक शिवदास तात्या पाटील, प्रा. समाधान पाटील जळगाव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख, मनोज पाटील सरपंच दुसखेडा, भगवान पाटील सरपंच वेरुळी, बबन ओंकार पाटील सरपंच आसनखेडा, योगेश पाटील सरपंच डॉ डोकलखेडा, हिरालाल पाटील सरपंच हडसन,वाल्मीक पाटील सरपंच पहान,जगन आप्पा पाटील सरपंच वरसाडे, विनोद तावडे सरपंच नांद्रा,सुभाष तावडे माजी सरपंच नांद्रा,शिवाजी तावडे उपसरपंच नांद्रा,राजू भैया पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख शरद दादा पाटील, उपतालुकाप्रमुख विनोद आप्पा पाटील, युवराज काळे,माजी सभापती पंढरी अण्णा पाटील,साहेबराव पाटील सुनील पाटील, शशी महाजन,आबा महाजन, ग्रामपंचायत सदस्य पप्पू भाऊ सूर्यवंशी, बंटी भाऊ सूर्यवंशी,किशोर भाऊ खैरनार, विनोद पाटील महिजी,राजू दादा हडसन, शरद पाटील,बाळकृष्ण साळुंखे उपसरपंच सामनेर, महेंद्र साळुंखे, विजू पाटील उपसरपंच गोराडखेडा, सागर पाटील, कैलास पाटील, विलास सुभाष पाटील, विलास जिभाऊ पहन, बालाजी पाटील,पका नाना,संजय जगन निलेश पाटील, सखाराम पाटील, दिलीप सूर्यवंशी अजय जयस्वाल नागराज पाटील,दिलीप पाटील,जावेद शेख, टिनू भाऊ,अतुल पाटील दहिगाव परिसरातील पत्रकार बांधव व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारथमिक आरोग्य केंद्र व वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉक्टर सह्या से व सर्व कर्मचारी स्टॉप यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद आप्पा बाविस्कर यांनी केले