महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती जळगाव परिमंडळ तर्फे लाक्षणिक संपात १०० टक्के सहभागी होण्यासाठी आवाहन

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती
जळगाव परिमंडळ

शाखेच्या वतीने आज दुपारी ३.३० वाजता जळगाव येथे कंपनी चे विश्राम गृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती
दि.०४/०१/२०२३ ते ०६/०१/२०२३ या ७२ तासांच्या लाक्षणिक संपात १०० टक्के सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे भांडुप परिमंडळ वाशी नवी मुंबई हे भाग समांतर वीज वितरण परवाना देण्यास सरकारच्या निर्णयाला विरोध व निषेध आणि खाजगीकरण व फ्रैचाईझीकरण रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे
संपात सहभागी होत असताना कोणत्याही धमकी किंवा चुकीच्या पद्धतीने प्रशासन करीत असलेल्या दबाव तंत्राच्या बाबतीत न घाबरता विद्यूत सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक तसेच सर्व सहाय्यक यांच्या सहीत,बाह्य स्त्रोत कर्मचारी तसेच कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता यांनी सुध्दा आपल्या सर्व सहकारी यांना कळकळीने आवाहन करण्यात आले आहे
जळगाव परिमंडळ अंतर्गत जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंता मिळून ५५०० च्या प्रचंड संख्येने सहभागी होणार आहेत असा निर्धार करण्यात आला आहे
परिमंडळ अंतर्गत सर्व विभागीय कार्यालय समोर आज द्वार सभा घेण्यात आल्या आहेत

*सदर बैठकीस कॉ.विरेंद्रसिंग पाटील, इंजिनीअर्स असो.श्री.पराग चौधरी,पवन वाघुळदे, बहुजन फोरम चे विजय सोनवणे, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना चे विनोद सोनवणे,पी आर सोनवणे, शरद पाटील, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना चे आर आर सावकारे, अशोक खडसे,विजय मराठे, उपस्थित होते*