रा.स्व.संघ.जनकल्याण समितीचे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे पाचोरा येथे उद्घाटन संपन्न

रा.स्व.संघ.जनकल्याण समितीचे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे पाचोरा येथे उद्घाटन संपन्न

जनसेवा हीच ईश्वर सेवा हा भाव मनात ठेवून रा.स्व.संघ. जनकल्याण समिती व संघ कार्यकर्ते समाजात विविध उपक्रम राबवत असतात समाजाला जिथे काही आवश्यकता असेल तिथे धावून जाणे व सहकार्य करणे ही प्रवृत्ती यात असते याच उद्देशाने पाचोरा शहरात रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन रमेशजी मोर,दिनेशजी अग्रवाल,मनीषजी काबरा, राजाभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यात गरजू रुग्णांना बेड,व्हिलचेअर,वाकर, ऑक्सीजन सेट,अशा सर्व प्रकारचे वस्तू गरजू रुग्णांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील तर आभार प्रदर्शन रवींद्र पाटील यांनी मानले.