संत भगवान बाबा आणि वामन भाउ पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हनुमान टाकळी आणि वडुले खुर्द येथे किर्तन महोत्सवाचे आयोजन

संत भगवान बाबा आणि वामन भाउ पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हनुमान टाकळी आणि वडुले खुर्द येथे किर्तन महोत्सवाचे आयोजन

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्रातील थोर संत भगवान बाबा आणि वामन भाउ यांच्या पुंण्यतिथी सोहळ्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे “किर्तन महोत्सव” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.संत भगवान बाबा मंदिरात प.पू.रमेशअप्पा महाराज यांच्या आशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे.दि.२६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.सर्व ह.भ.प.शिवाजी महाराज फुंदे, वैष्णवी महाराज राजळे, सुदर्शन महाराज कारखेले, अभिमन्यू महाराज भालसिंग, अनिल महाराज बर्डे, हरिश्चंद्र महाराज दगडखैर,अक्षय महाराज नागवडकर, महेश महाराज आव्हाड,यांची किर्तने होणार आहेत.दि.३फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०ते१२ ह.भ.प.आदिनाथ महाराज निकम यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. याच काळात “वडुले खुर्द ” येथेही संत वामनभाउ आणि भगवान बाबा मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ह.भ.प.सुनिताताई आंधळे, अनिल महाराज महाकले,महंत काशिनाथ महाराज,अक्रुर महाराज साखरे,रवी शास्त्री, मंगेश महाराज वराडे, स्वामी नित्यानंदगीरी महाराज, रामनाथ महाराज शास्त्री,यांची किर्तने होणार आहेत.शनिवार दिनांक ३/२/२४ रोजी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी ज्यांना जेथे सोईचे होईल तेथील किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान टाकळी/वडुले खुर्द येथील सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.