नविन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्रधानमंत्री वायफाय पि.एम.वाणी योजनेचा शुभारंभ

पाचोरा येथे पि.एम. वाणी योजनेचा शुभारंभ.

आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी नविन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्रधानमंत्री वायफाय पि एम वाणी योजनेचा शुभारंभ भारद्वाज नेटवर्क्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच भारतीय दुरसंचार निगम (बि एस एन एल) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा तालुक्यातील जारगाव या गावातून करण्यात आला. संपूर्ण जारगाव हे वायफाय ने कनेक्ट करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तहसीलदार मा. कैलास चावडे यांच्या हस्ते करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे बि एस एन एल चे महाप्रबंधक संजयकुमार केसरवाणी यांची देखील उपस्थिती लाभली. तहसीलदार कैलास चावडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. पाचोरा तालुक्यात मागील काही वर्षांपासून विविध स्तुत्य उपक्रम राबविण्या बाबत त्यांनी गोकुळ सोनार यांचे कौतुक केले. गावोगावी अशा वायफाय हब उभारणी ची गरज आहे तसेच कमी दरात इंटरनेट सुविधा पोहचावी अशी इच्छा व्यक्त केली. बि एस एन एल महाप्रबंधक संजयकुमार केसरवाणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संवाद साधला. प्रत्येक गावपातळीवर जेथे ब्रॉडबँड, मो नेटवर्क, किंवा एफ टि टि एच कनेक्टिव्हिटी पोहचू शकत नाही तेथे वायफाय च्या माध्यमातून पोहचून शैक्षणिक तसेच इतर सर्व सुविधा पोहचावी या साठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. भारद्वाज नेटवर्क्स सोल्युशन चे एम डी गोकुळ सोनार यांनी जळगाव जिल्ह्यातील पोचोरा तालुक्यातील जारगाव हे पहिले वायफाय गाव झाले असल्याचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण पाचोरा तालुका वायफाय करण्यासाठी काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक युवक महिला यांना रोजगार प्राप्त होणार आहे. कार्यक्रम प्रसंगी बि एस एन एल चे डि.जी.एम. ज्योती दामले, एस. डि. इ. पि.एम.पाटिल, जे.टि.ओ. चेतन शर्मा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिष्णा बोरुडे तसेच प्रास्ताविक गोकुळ सोनार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बापु मराठे, चंदन पारोचे, सैय्यद असिफ, सुशील खैरनार, राहुल सोनवणे, रोहिदास पवार आदींनी सहकार्य केले..