गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे आदित्य एल 1 मिशनचे आकर्षक प्रदर्शन

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे आदित्य एल 1 मिशनचे आकर्षक प्रदर्शन

आज दि. 2/9/2023 रोजी इस्रो तर्फे आदित्य L 1 चे सकाळीं 11.50 ला प्रक्षेपण झाले.या ऐतिहासिक घटनेचे लाईव्ह टेलिकास्ट ( प्रत्यक्ष प्रसारण) गुरूकुल मध्ये विद्यार्थ्याना दाखवितात असेल. तसेच हे मिशन सुबकतेने समजण्यासाठी आकर्षक अशा प्रोजेक्ट ची मॉडेलच्या स्वरूपात निर्मिती करण्यात आली. त्यात पृथ्वीच्या प्रतिकृती पासून तर रॉकेट लाऊंचर, सूर्य, ग्रहांची प्रतिकृती व एल 1 बिंदूवर फिरणारे सैटेलाईटची प्रतिकृती तैयार करून ते चलकृती करताना प्रदर्शित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व आदित्य एल 1 प्रतिकृती चे प्रक्षेपण करून करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा हटकर मैडम व प्रास्ताविक इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.
तसेच प्राचार्य श्री प्रेम शामनानी यांनी आदित्य एल 1 मिशन शी संबंधित माहिती देऊन लाईव्ह टेलिकास्ट नंतर ” प्रश्न मंजुषा” कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्याना प्रश्न विचारले व उत्तरांच्या स्वरूपात सर्वोत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व विषयाशी संबंधित आवड निर्मिती दिसून आली.