चोपडा महाविद्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या लाईव्ह सेशन कार्यक्रमाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या लाईव्ह सेशन कार्यक्रमाचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने डॉ.निर्मला सीतारामन (केंद्रीय अर्थमंत्री) यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा विभागातील विद्यार्थी व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. दिन.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.त्या प्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प कार्यक्रमाचे लाईव्ह सादरीकरण सर्व विद्यार्थी व प्राध्यापक बंधू भगिनींसाठी दाखवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बजेटसंबंधी विविध संकल्पनांची माहिती करून देण्यात आली तसेच बजेट कशा पद्धतीने सादर केला जातो? व बजेटचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सी.आर. देवरे , अर्थशास्त्र विभाग प्रमुख
सहा.प्रा.विशाल हौसे उपस्थित होते.
देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 लाईव्ह सेशन कार्यक्रमासाठी इंग्रजी विभागप्रमुख डी.एस.पाटील तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील पूजा पूंनासे, सहा.प्रा.आशा शिंदे, डॉ.एन.सी.पाटील, सहा.प्रा.एच.ए सूर्यवंशी, सहा.प्रा. जैन, सहा.प्रा.जोशी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.