सपासप नंग्या तलवारीचे वार उघड्या अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षाचे भविष्य

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सपासप नंग्या तलवारीचे वार उघड्या अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षाचे भविष्य

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) स्वतःच्या उघड्या अंगावर सपासप नंग्या तलवारीचे वार करत त्यांनी सांगितले आगामी वर्षाचे भविष्य,मीरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील बिरोबा भक्त सिताराम बाळाजी भगत यांनी विरभद्र मंदिरातील होईकात आगामी वर्षाची भविष्यवाणी वर्तवली.ती पुढील प्रमाणे “१) दिवाळीचा दिवा साजरा होईल,गोधन भरलं,पिडारं वाहीन,कैक हसतेन कैक रडतेन- म्हणजे दिवाळीच्या सणाच्या वेळी पाउस येईल,गाया धष्टपुष्ट होतील पण त्यांना आजार होईल,मग काही जण हसतील आणि काही जण रडतील.२)सटीच सटवण कुठं कुठं होईल,बांदाड होईल,अवकळ्या होईल,कैक रडतेन कैक हसतेन – म्हणजे चंपाषष्ठी ला पाऊस येईल पण तो काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही.म्हणजे एका शेतात पडेल पण त्यांच्या शेजारीच असलेल्या शेतात पडणार नाही. काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल.म्हणजे जेथे योग्य प्रमाणात पाऊल पडेल ते हसतील पण जेथे जास्त प्रमाणात पाऊस पडून पिकांची नासाडी होईल ते रडतील.३)दुग्धर येतील झोकार खातील,गहु हरभरे उशिरा होतील,जोडीन पिकतीन आणि सवाईन विकतील म्हणजे -गहु आणि हरबऱ्याची पेर उशिरा होईल पण बरोबरीन पिकतील आणि सव्वापट किंमतीने त्यांची विक्री होईल.४) बारा कोसांवर दिवा लागण,थंडीची लाट येईल,सोनं हजारात सोडीन, हिजड्यांचे राज्य येईल, म्हणजे- एखाद्या कुटुंबात मुलं होत नसतील तर त्यांना मुले होउन वंशावळ वाढेल‌.सोन्याचे भाव अजूनही वाढतील,सरकारा मध्ये अनेक पक्षांच्या मदतीने सरकार तयार होईल आणि कोणीही कोणाचं ऐकणार नाही.५)जठूड साधन,आखाडी पडन,ढगफुटी होईल,महापूर येईल,कैक हसतेन कैक रडतेन,गादीची छाया होईल म्हणजे-जून नंतर वेळेवर पेरणी होईल आणि पाहीले पिक जोरात येईल.आषाढ महीन्यात एक महिना पाउस पडणार नाही.ढगफुटी मुळे पाण्याचा महापूर येईल,हा पूर काहीना फायदेशीर तर काही लोकांना नुकसान करणारा ठरेल.अशी भविष्य वाणी मीरीच्या होईकात वर्तविण्यात आली .फटाके आणि शोभेच्या दारूच्या आतषबाजीत बिरोबा देवाची पालखी मिरवणूक (छबिना) काढण्यात आली होती.गावातील यात्रा कमेटीच्या वतीने राज्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.बिरोबा मंदिरासमोर सकाळी कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होउन रात्री कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निवृत्ति महाराज देशमुख इंदोरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम दुपारी ३ते५या वेळेत आयोजित करण्यात आला होता.परंतु त्यांनी भाविकांच्या डोळ्यात धुळफेक करीत एक तासच किर्तन करून आपला गाषा गुंडाळत बीडमधील कार्यक्रमाला जाण्यासाठी पोबारा केला.अत्यंत कमी वेळात किर्तन केल्यामुळे भाविकांनी अतिशय नाराजी व्यक्त केली.शिर्डीचे बिरोबा भक्त रतिलाल लोढा काका यांच्या वतीने बिरोबा दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.जेष्ठ पत्रकार दिपक टाकळकर, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले आणि अहिल्या नगर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब यांनीही या मंदिरास भेट देऊन बिरोबाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.बिरोबा मंदिरातील होईकाच्या कार्यक्रमासाठी मीरी सोसायटीचे माजी चेअरमन आसाराम भगत, बाबासाहेब निर्मळ,गोरक्ष वीर, अण्णा तोगे, भाऊसाहेब तोगे, मारूती हरीभाऊ सोलाट,गोटीराम तोगे,अशोक सोलाट,यांनी विषेश सहकार्य केले.जिल्ह्यातील भाविकांनी बिरोबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.