गणपती उत्सवात डीजे वाजवल्यास कारवाई अटळ,पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांचा गणेश मंडळांना इशारा तर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नका,आमदर राजळे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

गणपती उत्सवात डीजे वाजवल्यास कारवाई अटळ,पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांचा गणेश मंडळांना इशारा तर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू नका,आमदर राजळे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आगामी गणपती उत्सवात डीजे वाजवल्यास लगेच कारवाई अटळ असा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी गणपती मंडळाच्या व ईद ए मिलाद सन उत्सव शांतता समितीच्या बैठकीत दिला.तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी गणपती मंडळांना असे आवाहन केले की न्यायालयाचे नियम तोडून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडून नका.त्यामुळे गणपती मंडळ आणि प्रशासन यांच्यात गणपती उत्सवात तेढ निर्माण होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.डीजे,लेजर किरणे,आणि भेसळयुक्त गुलाल आणि इतर बोगस मालाची विक्री करणाऱ्या दुकानदारवर होणारी कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सनाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश उगले साहेब,आणि आमदार मोनिकाताई राजळे , तहसीलदार उद्धव नाईक साहेब यांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील गणेश मंडळाची शांतता समितीची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले.ते पुढे म्हणाले की डीजेवर कारवाई होईल,जप्त होईल अशी वेळ गणेश मंडळांनी येऊ देऊ नये.गणेश मंडळांनी डीजे सोडून सर्व प्रकारच्या पारंपारिक वाद्यांच्या वापर करावा.मिरवणूक वेळेवर संपवावी.कारण डीजे आणि लेजर किरणाच्या लाईटमुळे बऱ्याच जणांच्या डोळ्यांना ईजा होउन दुखापती झाल्या आहेत.डीजेमुळे वयस्कर व्यक्ती,लहान व्यक्ती यांना हार्ट ॲटॅक येऊन ते म्रुत्युमुखी पडलेले आहेत.म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने डीजे मिरवणुकीसाठी बंदी घातलेली आहे.त्यामुळे सर्व गणपती मंडळांना विनंती आहे की कोणत्याही डीजेचा आवाज हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या ध्वनिप्रदूषणा संबंधि निकषांमध्ये बसत नाही त्यामुळे कारवाई करावी लागते.आणि डीजे जप्त करावा लागतो त्यामुळे ऐनवेळी कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून आणि गणेशभक्त नाराज होऊनये.पुजा अर्चा करतांना कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की क्रुपया त्यांनी ढोल ताशा,लेझिम पथक, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पारंपारिक वाद्यांच्या वापर करावा.लेजर किरणे, आणि डीजेच्या वापरावर सक्त मनाई केली आहे.तसेच गुलाल हा रांगोळी मिश्रीत आणि केमिकल युक्त नसावा.अशा भेसळयुक्त साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारवर आणि गणेश मंडळावर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगताना गणेश मंडळांच्या द्रुष्टीने दुसरी चांगली बाजू ही सांगितली की गणेश मंडळांच्या स्थापनेपासून तर थेट विसर्जनापर्यंत जी गणपती उत्सव मंडळे चांगले काम करतील, शांततेच्या मार्गाने जातील,सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करतील उदाहरणार्थ ध्वनिप्रदूषण,डीजे , लेजर किरणे किंवा सामाजिक प्रबोधनात्मक देखावे या संबंधि पालन करणाऱ्या गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय,त्रुतिय,आणि उत्तेजनार्थ दोन असे पाच पारितोषिके देण्यात येणार आहे.त्यामध्ये सन्मानपत्र,सन्मान चिन्ह,आणि रोख स्वरूपातील रक्कम म्हणून बक्षिसे देण्यात येणार आहे.या अनुषंगाने आपण पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे आणि दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी सांगितले.आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की माझी गणेश मंडळाकडून अशी अपेक्षा आहे की आपले हार,तुरे,दुर्वा, निर्माल्य,प्रसाद हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे.आम्ही सर्व ठिकाणी आरतीला जातो त्यावेळी गुलाल एकीकडे,हार एकीकडे, गणपतीच्या सोंडेवर मोदक,त्याला मुंगळे लागलेले असे प्रदर्शन कोणत्याही मंडळाने करूनये.गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे खडेबोल सुनावत आमदार राजळे यांनी गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. गणेश मंडळाने गणपतीचे पावित्र्य राखले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या शांतता समितीच्या बैठकीत राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिरभाई शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,भाजपचे सचिन वायकर,मनसुर पठाण, सुनिल पाखरे,बंडू बोरूडे, हुमायून आतार, रामदास बर्डे, संजय मरकड, संतोष जिरेसाळआणि इतर पदाधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले.वीजमंडळ,आणि पाथर्डी नगर पालीकेच्या कारभारावर जोरदार टीका केली.तालुक्यातील प्रमुख गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे शेवगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (डी वाय एस पी) गणेश उगले साहेब, आमदार मोनिकाताई राजळे, तहसीलदार उद्धव नाईक यांचा सन्मान करण्यात आला.