खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. डॉ.निर्मल टाटीया

खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. डॉ.निर्मल टाटीया

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा समिती मारवड द्वारा कै.नानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालय, मारवड आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष व महिला गटासाठी दि.१० व ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी ‘आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांचे उदघाटन झाले. या उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. निर्मल आनंदराज टाटिया तसेच प्रमुख पाहुणे सौ.सपना निर्मल टाटिया, अस्थिरोगतज्ञ डॉ. दुर्गेश जयस्वाल आणि बालरोगतज्ञ डॉ.नीता जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील, मारवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. देवदत्त पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी उपप्राचार्य प्रा.डॉ. के एन सोनवणे, सौ. एम. टी.शिंदे तसेच विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यापीठ खेळाडूंच्याद्वारे क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. या स्पर्धेचे उदघाटक डॉ.निर्मल आनंदराज टाटिया यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून व ध्वजारोहण करून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहभागी खेळाडूंना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक सौ.के.एस.क्षीरसागर यांनी केले.
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना डॉ. निर्मल टाटीया म्हणाले की, खेळाडूंनी नेहमी स्वतःमध्ये खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. नियमित व्यायाम व समतोल आहार यातून खेळाडूंचे उत्तम भरण पोषण होण्यास मदत होते. यावेळी त्यांनी ‘संस्थेच्या शैक्षणिक विकासात क्रीडा क्षेत्राने अग्रेसर भूमिका बजावली आहे.’ अशा शब्दात संस्था आणि महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
यावेळी मारवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘ही स्पर्धा महाविद्यालयीन परिक्षेत्रांतील सर्वात मोठी स्पर्धा असून स्पर्धेचे आयोजन उत्तमरीत्या करून ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानी स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही महत्वपूर्ण बाब आहे. यावेळी त्यांनी संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांचे तसेच महाविद्यालयाचे कौतुक केले.
या स्पर्धेत अमळनेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव, चोपडा परिसरातील महाविद्यालयीन खेळाडू मोठया संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा संचालक सौ.के.एस. क्षीरसागर यांनी मानले.या स्पर्धेच्या आयोजन व नियोजनकामी स्पर्धेचे समन्वयक डॉ. एस. आर. पाटील, क्रीडा संचालक सौ.के. एस.क्षीरसागर आणि जिमखाना समिती सदस्य यांनी यांनी मेहनत घेतली. तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री. डी.पी.सपकाळे, डॉ. एम. एल. भुसारे, डॉ.एल. बी.पटले, श्री.डी.एस.पाटील, डॉ.आर.आर.पाटील, श्री.एम.बी.पाटील, श्री.ए एच.साळुंखे, श्री.वाय.एन. पाटील, श्री.ए. ए. पाटील, डॉ.पी.एन.सौदागर, श्री.एम.बी.पावरा, श्री.व्ही.एन.सूर्यवंशी, श्री.जी.बी.बडगुजर, श्री. बी.एच.देवरे, श्री.राजू निकम,श्री. रवींद्र पाटील, श्री. सुधाकर बाविस्कर, राकेश काविरे, योगेश निकम, श्री.डी.एस.राठोड यांनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेच्या उदघाटन समारंभाप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील बहुसंख्य खेळाडू, क्रीडा संचालक, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.