पाचोऱ्यात डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक संपन्न;तुषार मराठे अध्यक्ष तर सचिव पदी राहुल महाजन!

पाचोऱ्यात डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक संपन्न;तुषार मराठे अध्यक्ष तर सचिव पदी राहुल महाजन!

पाचोरा:आज दि.25 नोव्हेंबर 2021 वार गुरुवार रोजी बीएल पॅलेस हॉटेल येथे जळगाव जिल्हा मद्य विक्रेता संघाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन चे पदाधिकारी श्री. सतिश नारखेडे (जळगांव शहर अध्यक्ष, श्री.पंकज जंगले (सचिव),श्री.सुनिल भाऊ भंगाळे, श्री.नितीन पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पार पडली. याबत सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस हॉटेल व्यवसायावर होणारी ग्राहकांकडून दादागिरी त्याच बरोबर वाढती गुन्हेगारी,अवैध दारू विक्री, बनावट दारू विक्री यावर प्रतिबंध लागावे यासाठी उपस्थितांकडून मुद्दे उपस्थित करण्यात आले. यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री असल्याकारणाने याबाबत शासनाच्या मदतिने एक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यासाठी शासन दरबारी विनंती करणे. त्याचबरोबर शासनाला मदत करण्याचे हेतूने आपले संघटना ही राज्यभरात कार्य करणार आहे असे जळगाव येथील भंगाळे ग्रुपचे सुनील भंगाळे भुसावळ येथील पंकज जंगले यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. याच अनुषंगाने पाचोरा येथे लिकर असोसिएशनची सर्व वाईन शॉप,बियर शॉप,परमिट रम बियरबार तसेच देशी दारू दुकानाच्या संचालक मंडळींच्या माध्यमातून पाचोरा येथील हॉटेल व्यवसायिक श्री.तुषार मराठे यांची अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामध्ये *अध्यक्ष* -तुषार सुरेश मराठे
*उपाध्यक्ष* -अमित गोवर्धनदास रिझनी
*कोषाध्यक्ष* -मनोज चंदूमल केशवणि
*सचिव* -राहुल बा.महाजन
*उपसचिव* -अण्णा कानडे
*सल्लागार* -1-प्रदीप मराठे
2-राजेंद्र धनराळे
3-राजेंद्र मराठे
4-गोवर्धनदास रिझनी
*संचालक मंडळ*
1-चेतन पवार
2-संजय वाघ
3-सुनील मराठे
4-कुलदीप राऊत
5-शेरसिंग
6-ललित पटवारी
7-वैभव पाटील
8-विनोद तावडे
9-सुशील मराठे