पाचोऱ्यात शिव पिंडीची प्रतिष्ठापना भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या उपस्थिती करण्यात आली

महाशिवरात्रीच्या निमित्ताने

पाचोरा जुना अंतुर्ली रोड प्रभाग क्र. 9 मधील 25/2 वरील भागाचे जय योगेश्वर नगर असे नामकरण उदघाटन सोहळा व वृक्षारोपण व शिव पिंडीची प्रतिष्ठापना भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या उपस्थिती करण्यात आले.
तसेच यावेळी रहिवाशी नागरीकांनी अमोलभाऊ शिंदे यांच्या कडे रस्ते गटार व विविध समस्या मांडल्या तसेच हा परिसर शहरात असतानाही
या ठिकाणी कोणत्याही सुविधा नगरपालिकेने अद्याप केल्या नाहीत या रहिवासीतील नागरिक नगरपालिकेचा घरपट्टी नळपट्टी कर हा नियमित भरत असतानाही याकडे पालिकेने हेतुतः दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी बोलून दाखवली
तथापि भविष्यात या भागाचा प्राधान्याने विकास करण्यात येईल व स्वतः लक्ष घालेल असे अमोलभाऊ शिंदे यांनी नागरिकांना आश्वशित केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस योगेश ठाकूर,योगेश्वर नगर समितीचे शहराध्यक्ष विजय सावळे,भरत गोसावी,आशिष जाधव,सुरेश पाटील, सुहास ठाकूर, निलेश भुईकर,महेश पवार,राजाराम पवार, प्रदिप पवार,कुणाल पाटील, बंटी बागले, दिपक साळवे, रामदास साळवे, रोहित अहिरे, दिपक कोळी,मयुर पाटील, कल्पेश पाटील,घनश्याम सोनवणे,व परिसरातील असंख्य नागरिकांना उपस्थित होते