नवागांव (बुडकी) येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

नवागांव (बुडकी) येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला…

शिरपुर :- तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथील मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरीकांना हजेरी लावली तसचे रात्र भर पारंपारिक पद्धतीने आदिवासी नुत्य करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले अशी माहिती जितेंद्र पावरा यांनी दिले…..
शिरपुर तालुक्यात असलेल्या नवागांव (बुडकी) होळीला मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर असल्याने विशेष महत्त्व आहे, सदर होळी पहाटे पाच वाजता पेटविले जाते.हि होळी पाहण्यासाठी जिल्हातुनच नव्हे तर इतर जिल्हे, परराज्यातील हजारो नागरीक उपस्थित होते. रात्रभर पारंपरिक आदिवासी नुत्य करण्यात आले नवागांव गावातील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती तसचे समृहनुत्य, काली, बाबा, बुध्या, यांनी आदिवासी नुत्य चा आंनद घेतला..
होळीचा दिवशी आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा आहे.या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करत नाही तसचे खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही, पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही व होळी पेटेपर्यंत त्याचे नाचणे व गाणे हि सुरू असते…
यावेळी :- जितेंद्र पावरा (युवा कार्यकर्ता नवागांव), लक्ष्मण पावरा (पो.पाटील नवागांव), खंडु पावरा (वनकर्मचारी शहादा), जयदास पावरा, रमेश पावरा, किसन पावरा व मोठय़ा संख्येने नागरिक व ढोल वाजंत्री उपस्थित होते…..