पाचोऱ्यात आपत्कालीन गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी करून डॉ.अंकुर अनिल झंवर यांनी दिले एका रुग्णाला जीवनदान

नमस्कार डॉ. अंकुर सर

मी डॉ. अमोल पांढरकर, तुम्हा सर्वांचे लाडके बुरहानी इंग्लिश स्कूल मधील नंदू अंकल यांचा पुतण्या.

खरं तर काय बोलावं तुमच्या बद्दल दादा पण आज खरंच मला बोलायचय तुमच्या बद्दल. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहात आणि या वैद्यकीय क्षेत्रातील माझे आदर्श कारण जे पण तुम्ही आज मिळवलंय ते फक्त आणि फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर मेहनत यामुळेच त्यासाठी तुम्हाला सलाम.

खरं तर मागच्या आठवड्यातील ते काही तास आमच्यासाठी एक नवीन आव्हान घेऊन आलेत असच म्हणावे लागेल आणि एक कुटुंबाचा भाग असल्याने व जरी आपण या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलो तरी जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कुटुंबाबददल येते ना काय करावा नाही सुचत तेव्हा एक आधारस्तंभ म्हणून कुणी तरी हवा असता आणि याच वेळी एक “देवदुतासमान” तुम्ही धावून आलात आणि ज्या पद्धतीने ती कठीण परिस्थिती अतिशय शिताफीने सांभाळून जे काही तुमच्या जादुई हातांनी केलात ना म्हणजेच एक “गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी” यशस्वीरीत्या केलीत ना त्यासाठी खरच शब्द नाहीत माझ्याकडे आणि एवढंच नाही तर तुमच्या यशाच्या शिरपेचात अजून एक सोनेरी मुकुट प्रदान केला. आमच्या कुटुंबाला जणू नवसंजीवनी तुम्ही दिलीत त्यासाठी तुमचे खरच आभार.

तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा आणि असेच महान सेवेचे कार्य आणि व्रत तुमच्याकडून होवोत ही सदिच्छा करतो आणि तुमच्या हुषारीसाठी आणि कौशल्य पूर्वक प्रयत्नांसाठी त्रिवार सलाम

खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏

डॉ.अमोल पांढरकर
M.D( Med) Hom