माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळात विशेष व्यासंगी तज्ञ व्यक्ती सदस्य पदी निवड

माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळात विशेष व्यासंगी तज्ञ व्यक्ती म्हणून सह सदस्य पदी निवड

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोराचे माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळात विशेष व्यासंगी तज्ञ व्यक्ती म्हणून सह सदस्य पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्था व महाविद्यालय परिवाराच्या वतीने संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय नानासाहेब व्ही.टी.जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील माजी प्रभारी प्राचार्य डॉ.एस.एम.पाटील उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील उपस्थित होते.