नवरात्राेत्सवानिमित्त रांगाेळीतून साकारली दुर्गामाता

नवरात्राेत्सवानिमित्त रांगाेळीतून साकारली दुर्गामाता

जळगावातील महाबळमधील अनुराग स्टेट बँक काॅलनीतील वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी आपल्या छंदाला आकार देत नवरात्राेत्सवानिमित्त घरातच ६ बाय ४ आकारात पाेट्रेट रांगाेळीतून दुर्गामाता रेखाटली अाहे. ही रांगाेळी त्यांनी दरराेज ३ तास वेळ काढून ६ दिवसांत म्हणजे १८ तासात पूर्ण केली अाहे. यासाठी ७ किलाे रांगाेळी लागली अाहे. रांगाेळीत याेग्य रंग छटा दाखवण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रांगाेळीत लेक रंगांचा वापर केला अाहे. या कार्यासाठी त्यांना पती ज्ञानेश्वर बडगुजर व मुले िवपुल व निखिल बडगुजर यांनी मदत केली अाहे. पहिल्या प्रयत्नात रेखाटलेली अाकर्षक रांगाेळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत अाहे. वैशाली बडगुजर यांना चित्रकलेची अावड असून त्या घरकाम सांभाळून प्रत्येक सणांनुसार घरात रांगाेळी रेखाटत असतात.