मूकबधिर बालकाची ओळख पटविण्याचे आवाहन

मूकबधिर बालकाची ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव, दि. 6 – मूकबधिर बालकाला काळजी व संरक्षणासाठी जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह, जळगाव या संस्थेत अध्यक्ष/सदस्य बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशाने 17 फेब्रुवारी, 2021 रोजी दाखल करण्यात आलेले आहे.
हा बालक मुकबधिर असल्याने तो त्याचे नाव व पत्ता काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे या बालकास कोणी पालक, नातेवाईक, ओळखत असतील तर त्यांनी 30 दिवसाच्या आत जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह, जळगाव येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2239550, बाल कल्याण समिती, जळगाव दूरध्वनी क्रमांक 0257-2239851 अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव दूरध्वनी क्रमांक 0257-2228825 येथे संपर्क साधावा. या बालकाचे कोणी पालक किंवा नातेवाईक यांनी संपर्क न केल्यास बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशाने बालकाच्या पुढील पुर्नवसनाबाबत प्रक्रिया करण्यात येईल, असेही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.