पाचोऱ्यात बंद च महाविकास आघाडी तर्फे आवाहन

पाचोऱ्यात बंद च महाविकास आघाडी तर्फे आवाहन

पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांवर चिरडणार्या सरकार विरोधात महाविकास आघाडी च्या बंद मध्ये पाचोरा शहरातील महाविकास आघाडी पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भाजपा सरकार विरोधात देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असुन देखील हुकुमशाही प्रवृत्ती चे पंतप्रधान मोदी ऐकायला तयार नाहीत. त्यातच कॉंग्रेस च्या महासचिव प्रियंका गांधी यांना देखील अटक करण्यात आली याविरोधात महाराष्ट्रातुन तीव्र विरोध करण्यासाठी आज दि. ११ रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले असुन यात पाचोरा शहरातील सर्व व्यापारी बंधुंनी सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझर खान, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ८ वाजता महाविकास आघाडी तील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे