एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत गो.से. हायस्कूलचे सुयश

डिसेंबर-2025 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस) परीक्षेत श्री.गो.से.हायस्कूल. पाचोरा.मधील इयत्ता 8वी मधील खालील विद्यार्थिनींनी विशेष गुणवत्तेमध्ये यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र झाले. यशस्वी विद्यार्थिनींना शाळेतील उपशिक्षक श्री.अनिल पाटील. व श्री. डी.आर.टोनपे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील.व उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील.यांच्या हस्ते आज दिनांक 1 मे शुक्रवार रोजी सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थिनींची नावे
*1) काजल दीपक ब्राह्मणे*.
*2) जानवी अरविंद परदेशी*.
*3) रिद्धी नितीन देसाई*.
*4) विनिता अनिल धनगर*.
या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.आर.बी. बांठिया,पर्यवेक्षक श्री.एम.टी.कौंडीण्य, पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल.मॅडम, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय बी. सिनकर उपस्थित होते.





















