लिनेस क्लब पाचोरा कडून कामगारांसाठी मदतीचा हात; महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
लिनेस क्लब पाचोरा यांच्यामार्फत 30 एप्रिल 20 26, गुरुवार रोजी हात गाडी मजुरांना उन्हापासून संरक्षणासाठी बागायती रुमाल व पादत्राणे यांचे वितरण तसेच 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस या उपलक्षाने कामगार वर्गाच्या परिवारातील लहान मुलांना वही व चॉकलेटचे वाटप करण्यात लिनेस क्लब अध्यक्ष श्रीमती जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने व उपस्थितीत करण्यात आले.
पादत्राण्याची वितरण सौ प्रिया लाहोटीजी यांच्याकडून होते व लिनेस क्लब मधील फंड मधून बागायती रुमाल चे वाटप तसेच कामगाराच्या परिवारातील मुलांना व वह्यांचे वितरण श्रीमती रूपाली पाटील व चॉकलेटचे वितरण श्रीमती राजश्री जैन यांच्याकडून करण्यात आले. याप्रसंगी लिनस क्लबच्या कोषाध्यक्ष श्रीमती संगीता सिसोदिया जी श्रीमती सदामिनी पाटील शेवंती मोनिका थेपडे श्रीमती मंजू अग्रवाल श्रीमती अंकिता अग्रवाल उपस्थित होते. या उपक्रमाच्या शेवटी येण्यास क्लब सदस्य श्रीमती रूपाली पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झाला.

























