श्री.गो.से हायस्कूल चे कलाशिक्षक सुनील भिवसणे यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर साकारले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ या विषयावर चित्र रेखाटन

श्री.गो.से हायस्कूल चे कलाशिक्षक सुनील भिवसणे यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर साकारले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ या विषयावर चित्र रेखाटन

पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील कलाशिक्षक सुनील भिवसने यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कलाकृतीचा सुंदर असा प्रसंग संध्याकाळी रयतेच्या शेत शिवारात फेरफटका मारताना छत्रपती शिवाजी महाराज व मावळे शेतकरी यांचा हूबेहूब , बोलके सुंदर असा प्रसंग रेखाटला आहे असे मनमोहक सर्वांना आवडणारे चित्र पाहून विद्यार्थी व पालक भारावले आहेत त्यांच्या या कलाकृती बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ , मानद सचिव ऍड. महेश देशमुख,व्हा.चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे वासुदेव महाजन ,मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए. बी. अहिरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल ,सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी यांनी अभिनंदन केले