नांद्रा जवळील आसनखेड्या लगत असलेल्या जंगलाला आगीने वेढले,

नांद्रा जवळील आसनखेड्या लगत असलेल्या जंगलाला आगीने वेढले,

*पाचोरा* : नांद्रा गावापासून 3 ते 4 km जवळील असलेल्या आसनखेडा गावालगत असलेल्या जंगलाला अचानक दुपारी भर उन्हात आग लागल्याने वनविभागाची धावपळ उडाली, परंतु आगीची झळ जास्त प्रमाणत नसल्याने किरकोळ नुकसान होऊन जमिनीलगत गवत पूर्णतः जळून खाक झाल्याने तेथील हिरव्या गवतावर अवलंबून असणाऱ्या प्राणी मात्रांसाठी अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण होईल, वनविभाग व अग्नीदलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येऊन आगविझविण्यात यश आले आहे,
नुकतेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात 3 बिबट्यांची पिल्ले आढळली होती, या जंगलात हिंस्त्र प्राणी ही मोठ्या प्रमाणत आहेत, आसनखेड्यातील पोलीस पाटील किरण पाटील यांनीही धाव घेत जंगलाच्या इतर भागाची पाहणी करत शेतकर्यांचेही काही नुकसान झाले काय याची पाहणी केली,