आव्हाणे येथे गणेश जयंती उत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

आव्हाणे येथे गणेश जयंती उत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी सकाळी भल्या पहाटे गंगेच्या पाण्याने अंकुशराव कळमकर व बापुसाहेब भुसारी यांच्या हस्ते गणपतीचा महाअभिषेक आणि महाआरती करण्यात आली.सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.आदिनाथ महाराज निकम यांचे प्रवचन झाले.व नंतर बर्हाणपूरचे सरपंच सुभाष वाणी यांच्या हस्ते खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तर बऱ्हाणपूर येथील दुसरे गणेश भक्त बबनराव दिवटे पाटील यांच्या वतीने आकरा कॅरेट केळीचे वाटप करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थीनींना गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी यांच्याही हस्ते फळं वाटप‌‌‌ करण्यात आली.यावेळी अर्जुनराव सरपते, रामराव दिवटे, नारायण जाधव, कारभारी तळेकर, सुधाकर चोथे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त हे मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावून मोठी गर्दी केली होती.