Vinoba डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्म अंतर्गत ‘पोस्ट ऑफ द मंथ – मार्च 2026’ विजेत्यांचा गौरव
जळगाव : Vinoba डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्म अंतर्गत मार्च 2026 महिन्यासाठी “पोस्ट ऑफ द मंथ” उपक्रमातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
“पोस्ट ऑफ द मंथ” विजेत्यांमध्ये मनीषा पवार (जि.प. प्रा. शाळा खर्ची खुर्द, ता. एरंडोल), सविता करवटे (जि.प. प्रा. शाळा धामणगाव, ता. मुक्ताईनगर), कविता सुरेश वाघ (जि.प. प्रा. शाळा जळू, ता. एरंडोल), पल्लवी शिंदे (जि.प. शिवाजी आदर्श प्रा. शाळा हातेड बुद्रुक, ता. चोपडा) आणि राहुल पाटील (जि.प. प्रा. शाळा बिडगाव, ता. चोपडा) यांचा समावेश आहे.
तसेच “सकाळची सभा” उपक्रमात विनोद धनगर (सारोळे बुद्रुक, ता. पाचोरा), शितल सोनार (सोनवद, ता. धरणगाव) आणि अनिता शिंगारे (तोरणाळे, ता. जामनेर) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
“स्पेलिंग बी” स्पर्धेत योगिता लोखंडे (पिंपरी खुर्द, ता. धरणगाव), नीता काकर (घोडसगाव पुनर्वसन, ता. मुक्ताईनगर), सुवर्णा कारडेल (बांभोरे बुद्रुक, ता. धरणगाव), वंदना निकम (तरवाडे, ता. चाळीसगाव), शारदा पाटील (खंडाळे, ता. भुसावळ) आणि समाधान माळी (पिंपरी बुद्रुक, ता. पाचोरा) यांनी आपली छाप पाडली.
या सर्व विजेत्या शिक्षकांचा सत्कार शिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील साहेब (प्राथमिक, जिल्हा परिषद जळगाव) यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच या प्रसंगी विनोबा टीमचे जिल्हा समन्वयक हितेश भालेराव आणि सचिन ससाणे उपस्थित होते.
या सर्व शिक्षकांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक आकर्षक, सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित केले आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिकण्याची आवड वाढत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांमुळे सकारात्मक बदल घडत असून, Vinoba डिजिटल एज्युकेशन प्लॅटफॉर्म हा शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
सर्व विजेत्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत आहे.
























