श्री.गो.से . हायस्कूलच्या यशात अजून एक मानाचा तुरा

श्री.गो.से . हायस्कूलच्या यशात अजून एक मानाचा तुरा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील इ.8वी ड ची विद्यार्थिनी कु. दूर्वा अभिजीत पाटीलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
कु.दूर्वा व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. पी. एस. पाटील सर यांचा नियोजन भवन जळगाव येथे जिल्हाधिकारी मा.श्री. अमन मित्तल साहेब,जिल्हा कृषी संचालक डॉ. विकास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
दुर्वाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो. श्री. दिलीप वाघ,चेअरमन मा. नानासो.श्री. संजय वाघ,व्हा. चेअरमन मा. नानासो.श्री. व्ही. टी. जोशी, मानद चिटणीस मा. दादासो.श्री. महेश देशमुख,शालेय समिती चेअरमन मा. दादासो.श्री. खालील देशमुख,तांत्रिक विभाग चेअरमन मा. आण्णासो.श्री. वासुदेव महाजन,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम. वाघ मॅडम,उप मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील सर,पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील सर,श्री ए. बी. अहिरे सर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.