श्री गो.से. हायस्कूलच्या शिक्षकांचे TET व CTET परीक्षांमध्ये उत्तुंग यश

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से.हायस्कूल मध्ये TET व CTET परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या शिक्षकांना सत्कार करून गौरविण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील,
उप मुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहील, पर्यवेक्षक श्री.आर.बी. बांठिया, पर्यवेक्षक श्री.एम.टी. कौंडिण्य, कार्यालय प्रमुख श्री अजय सिनकर यांच्या हस्ते यश प्राप्त शिक्षक श्री.पी.एम.पाटील, श्री.आर.बी.बोरसे, श्री.पी.बी.पाटील, श्री.डी.आर.टोणपे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
शिक्षकांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री.दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन मा.नानासो. श्री.संजय वाघ, मानद सचिव मा.दादासो ऍड.श्री.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन मा. नानासो.श्री.व्ही. टी.जोशी,शालेय समिती चेअरमन मा.दादासो श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
























