शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी ! शेवगाव येथे सर्व सामान्य लोकांसाठी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षा अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न,शिंदे शिवसेनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
“शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी” उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचे उद्घाटन शेवगाव येथील आंबेडकर चौकात नुकतेच संपन्न झाले.या सहायता कक्षा मार्फत भविष्यात कोणत्या योजना कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे त्याची सवीस्तर माहिती मुळचे कोल्हापूर जे येथील परंतु आता पुणे येथे कार्यरत असलेले शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते मयुर कदम सर यांनी दिली.त्यांनी ही माहिती काकडे हायस्कूल येथे आयोजित केलेल्या “कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर” या कार्यक्रमात दिली.प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले जोतिबा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. या शिबिरासाठी शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षण शिबीरात प्रामुख्याने “शिवसेना आपल्या दारी, घेऊन आली योजनांची शिदोरी” हा उपक्रम कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे त्याची सविस्तर माहिती दिली.त्या अनुषंगाने तालुक्यातील विधवा महिला, जेष्ठ नागरिक, शेतकरी,आजारी व्यक्ती,सामान्य महिला,मुली, शालेय विद्यार्थी, व्यावसायीक, बचतगट,दिव्यांग व्यक्ती,पोस्टाच्या योजना,सामान्य नागरिक, महानगर पालिका,नगर परिषद,जिल्हा परिषद, महामंडळ, आयुष्यमान भारत,महात्मा फुले जन आरोग्य, एसटी भाडे पास सवलत,स्मार्ट कार्ड,लाडकी बहिण योजना, मतदार ओळखपत्र या सर्व सरकारी योजना या सहायता कक्षा मार्फत राबविण्यात येणार आहे.या योजनांची अंमल बजावणी करण्यासाठी “योजना दुतांची” निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यां मार्फत प्रचंड प्रमाणात अतिशय वेगाने मेहनत घेऊन प्रत्येक गावात जाऊन अर्ज भरून ही माहिती एका साॅप्टवेअर मध्ये संकलित करण्यात येणार आहे.यामध्ये एकूण पाच हजार योजनांचा समावेश आहे.या योजनेमुळे शेवगाव तालुक्यातील गोर गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या मतदार संघात राबविलेला उपक्रम हा प्रथमच अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे.जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेब आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती हर्षदाताई काकडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रत्येक गावातील लाभार्थ्यांचा डेटा तयार करून तो लाभार्थी कोण कोणत्या योजना साठी पात्र आहेत त्या योजनांचा लाभ त्यांना देण्यात येणार आहे.शेवगाव तालुक्यातील लाभार्थ्यांनी तातडीने या योजना दुतांशी संपर्क साधुन आपला “डेटा अर्ज” भरून तयार करून घ्यावा आणि या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेब यांनी केले आहे. प्रथम शेवगाव तालुक्यातील ६४ गावातील शिवसेना शाखा प्रमुखांना प्राधान्य देण्यात येणार आहे.ग्रामीण भागात शिवसेना पक्ष वाढविण्या साठी याचा चांगला फायदा होणार आहे.संपूर्ण शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी या माध्यमातून विषेश प्रयत्न केले जाणार आहेत.या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते अंकुशराव चितळे,राम पोटफोडे, पृथ्वीराज काकडे, राजेंद्र भुसे, बाळासाहेब मडके,चेमटे मेजर,वैभव पुरनाळे,हर्षद कचरे,अशोक तरसे,महेश मडके,अमोल निकम,ओंकार मंडलिक,किशोर धोत्रे,आबासाहेब बेडके,राजू मामा फलके हे आवर्जून उपस्थित होते.आभार लक्ष्मण गवळी यांनी मानले.शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना योजनेच्या फाईलचे वाटप करण्यात आले. आणि नवीन आलेल्या कार्यकर्त्यांचा काकडे साहेब यांना परीचय करून देण्यात आला.काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
























