हाच तो मॅजिक पेन जो करतो कारागिरी..

*हाच तो मॅजिक पेन जो करतो कारागिरी*
*उलट बाजूने उष्णता देताच या पेनाने लिहलेले होते गायब-

*पाचोरा : बोगस पावत्यांचा व मॅजिक पेन चा खेळ सुरू*
एरंडोल तालुक्यातील उत्रान येथील गिरणा नदी पत्रातील दिलेल्या ठेक्या मधील वाळू ठेक्यामध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन करत मॅजिक पेन चा वापर करून बोगस पावत्या दाखवत अधिकची वाळू उचलत शासनाची फसगत तेथिलच मोरख्यांकडून केली जात असून बडे अधिकारी प्रशासन वर्ग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत की काय याबाबत शंका निर्माण होत असून तात्काळ चौकशी करून सदर ठेका रद्द करावा याबाबतची मागणी तेथूनच होत असतानाच पर्यावरण बचाव वाळू वाहुतक संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनीही याविषयी लक्ष वेधले होते, तसेच हाच ठेक्या रद्द करण्याबाबत आता अधिकृत तक्रार ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी जिल्हा ,विभाग तसेच महाराष्ट्र राज्यात सह राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ मान्यवरांकडे केली आहे.