आई महोत्सवानिमित्त सोयगाव येथे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
सोयगाव प्रतिनिधी दत्तात्रय काटोले
सोयगाव : आई महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा सोयगाव येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री उपक्रमांतर्गत ‘विद्यार्थी आरोग्यक्षम घडविणे’ या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सोयगाव येथील समाजप्रबोधनकार विष्णू मापारी व आरोग्यदूत दिगंबर वाघ यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात शेंदुर्णी येथील प्रसिद्ध दंततज्ञ डॉ. चैतन्य कासार व डॉ. सौ. पूजा कासार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, योग्य ब्रश करण्याची पद्धत व तोंडाच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी समाजसेवक संजय शहापूरकर तसेच सोयगाव केंद्राचे प्रमुख फिरोज तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृषिभूषण अरुण सोहनी यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे टूथपेस्ट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किरण पाटील, पदवीधर शिक्षिका सुरेखा चौधरी तसेच पंकज रगडे, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, प्रतिभा कोळी, गणेश बावस्कर, अंकुश काळे, मंदा मस्के, पांडुरंग बारगजे, विवेक महाजन, अनिल देसाई, तानाजी चव्हाण, शुभम देसले, पुनम लाड आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंकज रगडे यांनी मानले.
फोटो दत्तात्रय काटोले
























