Home महाराष्ट्र मृत्यू लोकात सर्वात श्रेष्ठ आपले आईबाप आहेत,मायबापा ची सेवा केल्याने आपली सर्व...

मृत्यू लोकात सर्वात श्रेष्ठ आपले आईबाप आहेत,मायबापा ची सेवा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात : ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड 

मृत्यू लोकात सर्वात श्रेष्ठ आपले आईबाप आहेत,मायबापा ची सेवा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात : ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

मृत्यू लोकात सर्वात श्रेष्ठ आपले आईबाप आहेत त्यांची सेवा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात असा संदेश डोंगर वाडीच्या श्रीराम संस्थानचे महंत ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांनी दिला.ते अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त किर्तन महोत्सव सोहळ्यातील काल्याच्या किर्तना प्रसंगी बोलत होते. कराड महाराज पुढे म्हणाले की मातृ पितृ, आचार्य,अतिथी ही सर्व देवाची रुपे आहेत.सर्व तीर्थात काशि हे तीर्थक्षेत्र श्रेष्ठ आहे.आणि काशी तीर्थक्षेत्रा पेक्षा ही आपले मायबाप हे सर्वात मोठे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे.ज्यांचे मायबाप जीवंत आहेत त्यांनी आपल्या आई वडीलांची सेवा करावी.साधुच्या संगतीत गेल्यावरही आपली पापं नष्ट होतात.पण साधू हा कर्तुत्ववान असला पाहिजे. देवाने आपल्या सर्व भक्तांचा उद्धार केला पाहिजे असे सर्वांनाच वाटत असेल तर प्रत्येक भक्ताने पुंडलिका प्रमाणे आपल्या आई वडीलांची सेवा करावी.आई नेहमीच आपल्या लेकरांचे हीत पहात असते.आईच्या हातात,सेवेत,व दृष्टीत मोठी ताकद आहे. परमात्म्याची अनंत रूपे आहेत.निष्काम भक्ती करणाऱ्या वरच देव प्रेम करतो.असा संदेश कराड महाराज यांनी देउन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तसेच शेवटी मळगंगा माता यात्रेत कोणीही पशुहत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले.रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत हा सोहळा संपन्न झाला.या सप्ताहात सर्व ह.भ.प.महेश महाराज आव्हाड,कु. वैष्णवी महाराज वाघमोडे, चंद्रकांत महाराज दगडखैर, वैभव महाराज माळवदे, संकेत महाराज शास्त्री,जगन्नाथ महाराज शास्त्री, ऋतुजा महाराज वैद्य,यांची किर्तने झाली.तसेच गावातून दिंडी प्रदक्षिणा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली होती.गावातील सर्व विणेकरी तरूण मंडळाच्या वतीने काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. गावातील माता भगिनी नर्मदाताई आव्हाड,मा. सरपंच छायाताई उघडे,पाटलीन बाई चंद्रकला उघडे,निर्मलाताई पाचरणे,यांनी कराड महाराजांचे औक्षण केले.या सप्ताहात उघडे, वाघमोडे,ढाकणे,खरात, दिंडे,सरोदे,माने, आव्हाड,खेडकर, या परीवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आले.काल्याच्या किर्तना प्रसंगी मुटकुळे ताई, ज्ञानदेव माऊली मतकर,विठ्ठल महाराज डोईफोडे,बबन महाराज कुटे,ठकाजी महाराज दिंडे, आणि कोपरे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडुले खुर्द येथिल भटणी वस्ती येथे ही रात्री ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांचे किर्तन झाले.

Don`t copy text!