क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त पाचोऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
पाचोरा प्रतिनिधी ( संदीप तांबे )
पाचोरा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दि. 11 एप्रिल 2026 रोजी पाचोरा शहरातील विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळे, युवक मंडळे तसेच राजकीय पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास आमदार किशोरआप्पा पाटील (अध्यक्ष, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जन्मोत्सव समिती, पाचोरा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे —
सकाळी 09.00 वा. : पायी रॅली (कृष्णापुरी ते महात्मा फुले स्मारक)
सायं. 6.00 वा. : भव्य मिरवणूक (कृष्णापुरी ते महात्मा फुले स्मारक, पाचोरा)
त्यानंतर दि. 12 एप्रिल रोजी रात्री 8.00 वा. विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, पुणे येथील प्रख्यात वक्ते मा. पेंगंबर शेख (सुधारणावादी विचारवंत) हे मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्यानाचा विषय — “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे वैचारिक नाते”
स्थळ — सप्तश्रृंगी देवी मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा.
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षणे —
सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या पहिल्या शाळेचा देखावा
महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाजोद्धार कार्याचा देखावा
ढोल-ताशा पथक
आकर्षक बँड पथक
या सर्व कार्यक्रमांना पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जन्मोत्सव समिती, पाचोरा व जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
























