आखतवाडे येथे जिप उर्दू शाळेत एका शिक्षकाची नेमणूक साठी उपसरपंच दिपक गढरी यांचे गटशिक्षणअधिकारी यांना निवेदन

पाचोरा आखतवाडे येथे जिप उर्दू शाळेत एका शिक्षकाची नेमणूक साठी उपसरपंच दिपक गढरी यांचे गटशिक्षणअधिकारी यांना निवेदन

आज दिनांक 23/2/ 24/ रोजी मौजे आखतवाडे ता पाचोरा येथील उपसरपंच दिपक गढरी यांनी पाचोरा गटशिक्षणाधिकारी श्री समाधान पाटील यांना आखतवाडे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत एका शिक्षकाची तात्काळ नेमणूक करावी यासाठी निवेदन दिले
निवेदनात सांगितले आहे की महोदय आखतवाडे येथील जि प उर्दू शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत पहिली ते पाचवी ची पटसंख्या 41 आहे आणि सहावि ते सातवीची पटसंख्या 17 आहे आणि आज रोजी दोनच शिक्षक कार्यरत आहेत पहिली ते पाचवी मध्ये मागील जून 2023 पासून एका शिक्षकाची जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून जि प उर्दू शाळा येथे तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अश्या अशयाचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर सरपंच कल्पना पंडितराव गढरी उपसरपंच दिपक गढरी, ग्रामसेवक आनंद आबाराव मुळे, निजामुद्दीन समसुद्दीन, इसामुद्दिन चिरागउद्दीन, शालेय व्यवस्थापन समितीचे, अध्यक्ष आयुबबेग अब्बास बेग, शाबीर शहा सुलेमान शहा, शहबाज खान सुलतान खान, शबाना बानो शोकत खान, चांदखा जब्बारखा, शौकतखा बशीरखा, कुदबुद्दीन चिराखोद्दीन, सरफराज शहा शाबीर शहा आदीच्या सह्या आहेत.