Home पाचोरा पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार

पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार

पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार

 

 

पाचोरा : प्रतिनिधी संदीप तांबे

जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथील एडवेंचर पार्कच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देत गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, स्वच्छता, तसेच इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महिलांनी समाजाच्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगती साधली असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी भा. ज. पा. नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त करण्यात आले.

 

एडवेंचर पार्कच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी पहिल्याच वर्षी विविध उपक्रम राबविले गेला आहे.

यंदाचा महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

या प्रसंगी शहरातील अनेक महिला, नागरिक व आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एडवेंचर पार्कच्या संचालक संदीप जैन,विपुल जैन,अमोल जैन यांनी केले होते.

Don`t copy text!