Home महाराष्ट्र प्रत्येक गावा गावात मारुती असले तरी ते मारुती नाहीत, तर ते सर्वांचे...

प्रत्येक गावा गावात मारुती असले तरी ते मारुती नाहीत, तर ते सर्वांचे अधिपती भगवान शंकर आहेत : ह.भ.प. निवृत्ती महाराज मतकर 

प्रत्येक गावा गावात मारुती असले तरी ते मारुती नाहीत, तर ते सर्वांचे अधिपती भगवान शंकर आहेत : ह.भ.प. निवृत्ती महाराज मतकर

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

आपण प्रत्येक गावा गावात मारूती पाहतो पण ते मारुती असले तरी ते मारुती नाहीत तर ते भगवान शंकराचे अवतार आहेत असे उदगार आळंदी निवासी ह.भ.प.निवृत्ती महाराज मतकर जवखेडकर यांनी काढले. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील वृद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त त्रिदिनी किर्तन महोत्सव सोहळ्यातील सांगता समारंभातील काल्याच्या किर्तना प्रसंगी बोलत होते. निवृत्ती मतकर महाराज पुढे म्हणाले की सर्व प्रथम कुलदेवतेचे स्मरण करून गणपतीला मान द्यावा.ग्रंथाचे पारायण आपल्याला सुखी केल्या शिवाय राहणार नाही.सर्व देवांचे अधिष्ठान भगवान महादेव आहेत.देवीची सर्व रुपे म्हणजे पार्वती होय.सर्व देव हे श्रेष्ठ नसतात आणि जे श्रेष्ठ असतात ते शनिदेवा सारखे वाद घालत नाहीत.कारण शनिदेव हे सर्व राशिचे न्यायाधीश आहेत.कृष्ण चरीत्र सांगताना कृष्णाचा जन्म नेमका बुधवारीच का झाला,आणि रोहीणी नक्षत्रावर का झाला याचे सविस्तर वर्णन सांगून गंगा,यमुना, नर्मदा,डोह, आणि पृथ्वी यांना कृष्ण जन्मल्याने आनंद का झाला याची सविस्तर माहिती देऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या तिन दिवसीय किर्तन सोहळ्यात ह.भ.प.पोपट महाराज कुसमुडे,ह.भ.प. हरीभाउ महाराज भोंदे,ज्ञानेश्वर महाराज कराळे यांचीही किर्तने झाली.वृद्धेश्वर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ पाटील यांनी मतकर महाराज यांना मोठा पुष्पहार घालून सन्मानित केले.या सोहळ्यासाठी जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, बाबासाहेब सरगड,नामदेव सरगड,शिवाजी मतकर,विष्णू घाटूळ, अच्युतराव वाघ, ज्ञानदेव मतकर, दगडू आंधळे दुकानदार, आबाजी आंधळे, आदिनाथ वाघ, सरपंच चारूदत वाघ पाटील, ॲडव्होकेट वैभव आंधळे,विठ्ठल मतकर,अण्णा तळेकर,नवनाथ वांढेकर, हिराजी मतकर, प्रल्हाद आंधळे, कांबळे सर, सोमनाथ काळे, रावसाहेब देशमुख,संभाजी वाघ,अशोक वाघ, आदिनाथ नवले, राजेंद्र मतकर सर, कैलास धनवडे,भागवत घाटुळ,ह.भ.प. बाबासाहेब मतकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी,भगवान सरगड, भाऊसाहेब आंधळे,उत्तमराव आंधळे,ह.भ.प. स्नेहल नवले, आणि कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रघुनाथ लांघे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली..

Don`t copy text!