शनेश्वर जयंती जन्मोत्सवा निमित्ताने ताजनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

शनेश्वर जयंती जन्मोत्सवा निमित्ताने ताजनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रीशतकोत्तर अम्रुतमहोत्सवा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथे दिनांक २० ते २७ मे या कालावधीत या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड संस्थानचे प्रमुख ह.भ.प. भास्करगीरी महाराज, ताजनापूर येथील दत्त देवस्थान आश्रमाचे गुरुवर्य बालयोगी महाराज यांच्या क्रुपा आशिर्वादाने आणि ह.भ.प.मच्छिंद्र महाराज भोसले,ह.भ.प. कारभारी महाराज वीर, ह.भ.प. सुधाकर नजन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शनैश्वर जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने ताजनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सोहळा संपन्न होत आहे.या सप्ताहात दररोज काकडा भजन,हरीपाठ,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, प्रवचन आणि हरी किर्तन या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. सर्व ह.भ.प.दिलिप महाराज देवढे, बाबासाहेब महाराज मतकर, भालेराव काका दारकुंडे, ज्ञानेश्वर माउली व्यवहारे, सर्जेराव महाराज जाधव, रमेश महाराज राजपूत,बालयोगी महाराज यांची प्रवचने होणार आहेत तर सर्व ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर, पल्लवीताई आवरी तोरमल, अशोकानंद महाराज सावरगावकर, बारीक राव महाराज वीर,हरी महाराज वाघचौरे,मच्छिंद्र महाराज भोसले, ज्ञानेश्वर माउली करंदीकर, शिरीष महाराज डोंगरे,यांची किर्तने होणार आहेत.दिनांक २७ मे रोजी ह.भ.प.संभाजी महाराज देवकुळे, यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि दत्तात्रय लंगोटे,व नारायण रोडगे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या गौरवशाली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी बोडखे,खुंटेफळ, दादेगाव,जुने नवे दहीफळ, आणि ताजनापूर पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन शनैश्वर देवस्थान आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.या सप्ताहात ज्ञानेश्वरीचे पारायण अध्ययन ह.भ.प.शिवाजी महाराज काळे हे करणार आहेत.तर हरीपाठ व काकडा भजन ह.भ.प. कारभारी महाराज वीर, व रमेश महाराज रजपूत हे करणार आहेत.तरी या सप्ताहात सर्व भाविकांनी दररोज उपस्थित रहावे असे सप्ताह कमीटीतर्फे तर्फे कळविण्यात आले आहे.