Home पाचोरा गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात “पोषण आहार सेविकांचा केला सन्मान”

गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात “पोषण आहार सेविकांचा केला सन्मान”

गो.से.हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात “पोषण आहार सेविकांचा केला सन्मान”

 

 

 

 

पाचोरा:~ येथील पीटीसी श्री.गो.से.

हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक एन .आर.पाटील(ठाकरे ) यांचेहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी जागतिक महिला दिन म्हणजे महिलांनी समाज उत्कर्षासाठी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी आपल्या कार्यातून केवळ कुटुंबच नव्हे तर राष्ट्रीय हितासाठी मोठे योगदान दिले असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या पोषण आहारासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोषण आहार सेविका,शेतकरी पत्नी तसेच स्वच्छता कर्मचारी भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडिण्य, ज्येष्ठ शिक्षक डी.डी.विसपुते,पोषण आहार समिती प्रमुख एन. एस.पाटील, शिक्षकेतर कर्मचारी विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!