पाचोरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

पाचोरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

पाचोरा दि. 07 – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन खडकदेवळा खु.||, ता. पाचोरा येथे दि. 02 फेब्रुवारीला मा. श्रीमती रंजना अविनाश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे व्हा. चेअरमन व कबचौउमवि, जळगावचे अधिसभा सदस्य मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपण समाजाचे देणे लागतो, आपल्यात श्रमसंस्कार रुजावेत, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी व तुमच्यातील स्नेहभाव वाढवा यासाठी अशा श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. सुदाम वाघ यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाला रासेयोचे विभागीय समन्वयक मा. प्रा. वाय. बी. पुरी, जि. प. शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. हानिफ शेख शरीफ, मुख्याध्यापक मा. श्री. रवींद्र शिंदे, माजी मुख्याध्यापक मा. श्री. शरद पाटील, श्री. रामचंद्र शेलार, श्री. जितेंद्र पाटील, श्री. बापू पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, डॉ. के. एस. इंगळे, रासेयो अधिकारी प्रा. आर. बी. वळवी, रासेयो महिला अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शरद पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. वैशाली कोरडे, प्रा. संजिदा शेख, श्री. ऋषिकेश ठाकूर, श्री. विजय सोनजे, श्री. मच्छिंद्र पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्रा. आर. बी. वळवी तर सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे व आभार डॉ. एस. बी. तडवी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे व स्वयंसेवक-स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.