नांद्रा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न विद्यार्थ्यांनी ही दिली ऑनलाइन उपस्थिती

नांद्रा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न विद्यार्थ्यांनी ही दिली ऑनलाइन उपस्थिती

नाँद्रा ता.पाचोरा (वार्ताहार)-येथील क्रिएटिव्ह स्कूलला सालाबादाप्रमाणे यावर्षीही 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारैहनाचा सन्मान गावातील जेष्ठ माजी सैनिक जगन्नाथ फौजी पाटील याँना देण्यात आला त्यांच्या शुभहस्ते सकाळी ७.३० वा स्कुलला ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आॕनलाईन चालू असलेल्या शिक्षणाबरोबरच यावर्षी आॕनलाईन ध्वजारोहनाला ही आपली उपस्थित नोंदवून ध्वजारोहनाचा आनंद घेता आला त्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या लिंक द्वारे विद्यार्थी सहभागी झालेत . याबरोबरच ग्रामपंचायत नांद्रा येथील ध्वजारोहन सरपंच आशाताई भिकन तावडे यांच्या हस्ते ,जि प प्राथमीक शाळा येथील ध्वजारोहन ग्रा.प.सदस्या कल्पना सुभाष तावडे,तलाठी कार्यालय याचे ध्वजारोहन हिरालाल भारत सूर्यवंशी ,प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहन जि प सदस्य पदम बापू पाटील ,माध्यमिक विद्यालय येथे डॉ.वाय.जि.पाटील पाटील यासर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी क्रिएटिव्ह स्कूलला विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून व त्यांच्यात देशभक्ती ,राष्ट्रीय एकात्मता व देश प्रेम वाढीस लागून त्यांना अभिव्यक्त होता यावे म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं ऑनलाइन लाईव्ह सादरीकरण करण्यात आले यामध्ये 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये वकृत्व स्पर्धा, देशभक्ती गायन ,फॅन्सी ड्रेस, नृत्य अशा स्पर्धेचा समावेश करण्यात आला विद्यार्थ्यांना या नाविन्यपूर्ण ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या विविध गुण कौशल्य दाखवण्याचं व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण होऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अरुंधती राजेंद्र यांनी केले तर प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन नम्रता पवार यांनी केले याप्रसंगी शिक्षिका वृंद मनीषा बडगुजर उज्वला महाले ,पूजा सोनजे,हिना पाटील ,शिपाई सुभाष पिंपळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी परिश्रम घेतले .याप्रसंगी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत कमिटीचे विनोद तावडे ,उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, किशोर खैरनार,सखाराम तुकाराम पाटिल,संजय जगन पाटिल,ओमभाऊ पवार, संदीप सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी,शरदफौजी बोरसे, गजानन ठाकुरसर ग्रामसेविका सपकाळे मॅडम, यांनी उपस्थिती दिली.