महसूल विभागाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज शिव समाधान शिबिर’ उपक्रम यशस्वी; महिला दिनानिमित्त नागरिकांना सकारात्मक संदेश
सोयगाव प्रतिनिधी, दत्तात्रय काटोले सोयगाव.
सोयगाव : महसूल विभागाच्या वतीने मंडळ स्तरावर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शिव समाधान शिबिर’ अभियानाअंतर्गत जरंडी मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक प्रलंबित महसुली कामे मार्गी लावण्यात आली.
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. संभाजी अडकूणे साहेब (अप्पर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर) तसेच मनीषा मेने मॅडम (तहसीलदार, सोयगाव) यांची उपस्थिती लाभली. तसेच शिवाजी येंबुलवार साहेब (गट विकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव), कासार साहेब (कृषी अधिकारी, सोयगाव), एस. पी. सैवर मॅडम (बाल विकास प्रकल्प अधिकारी, सोयगाव), काकासाहेब सावळे (नायब तहसीलदार, सोयगाव), राहुल पत्रिके साहेब (नायब तहसीलदार, सोयगाव) व बहुरी साहेब (नायब तहसीलदार, सोयगाव) उपस्थित होते.
यावेळी पुष्पाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य), संविता ताई गावंडे (पंचायत समिती सदस्य), स्वातीताई पाटील (माजी सरपंच, जरंडी) तसेच सुनील भाऊ गावंडे (भाजपा जिल्हा सचिव, संभाजीनगर) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
जरंडी मंडळाचे मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या अथक परिश्रमातून या शिव समाधान शिबिरामध्ये नागरिकांची विविध महसुली कामे तात्काळ पूर्ण करण्यात आली. त्यामुळे मंडळातील नागरिकांचे समाधान झाले असून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत समाजातील महिलांनी शिक्षण, स्वावलंबन व नेतृत्व या क्षेत्रांत पुढे येण्याचे आवाहन केले. महिला सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि देशाची प्रगती अधिक वेगाने होईल, असा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला.
फोटो,दत्तात्रय काटोले
























