महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 

 

पुणे, दि. ३० सप्टेंबर-

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ना. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सन २००६ ते २०१८ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

 

पुणे येथे २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या शासकीय परिषद सभेत तसेच शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-पुणे येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ना. अजितदादा पवार यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ अश्विनी पाटील होत्या. यापूर्वी अध्यक्ष असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त अध्यक्षस्थानी शासकीय परिषदेत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेतही ना. अजितदादा पवार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी सांगितले.

——